5 कोटीत होणार #चंद्रपूर मनपा क्षेत्रातील विकास | आमदार किशोर जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२५ डिसेंबर २०२१

5 कोटीत होणार #चंद्रपूर मनपा क्षेत्रातील विकास | आमदार किशोर जोरगेवार


 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी नगर विकास वैशिष्टपूर्ण निधीतील कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून महानगरपालिका हद्दीतील विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.
       चंद्रपूर शहरातील विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. विधानसभा क्षेत्राचा नागरिकांना अपेक्षित असा विकास करता यावा याकरिता त्यांनी विविध विभागाचा निधी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी खेचून आणला आहे. दरम्याण नगर विकास विभागाचा वैशिष्टपूर्ण निधी चंद्रपूर शहराच्या विकासकामांसाठी मिळावा याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. या संदर्भात त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. या मागणी संदर्भात विभागाशी त्यांचा सततचा पाठपूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले असून वैशिष्टपूर्ण निधीतील कोटी रुपयांचा निधी चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रामनगर येथील सिमेंट काँक्रीट रोडचे कामनगिनाबाग येथील खुल्या जागेवर समाज भवनाचे बांधकामप्रभाग क्रमांक येथे एक कोटी 5  लक्ष रुपयातून काँक्रीट रोडचे बांधकामप्रभाग क्रमांक 10 मध्ये 80 लक्ष रुपयातून काँक्रीट रोड व भुमिगत नालीचे बांधकामआनंद बुद्ध विहार श्रमिक नगर परिसरात लादीकरणछत्रपती नगर येथे काँक्रीट रोड व नालीचे बांधकाम, 50 लक्ष रुपयातून बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कलेज पर्यंत काँक्रीट रोड व भुमिगत नालीचे बांधकामबाबुपेठ येथे रोडचे बांधकामयासह इतर कामे प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच सदर सर्व विकास कामे पूर्ण होणार आहे.


@kishorjorgewar