ओबीसींना 27% राजकीय आरक्षण देण्यात यावे : डॉ बबनराव तायवाडे Dr. Babanrao Taywade - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१९ डिसेंबर २०२१

ओबीसींना 27% राजकीय आरक्षण देण्यात यावे : डॉ बबनराव तायवाडे Dr. Babanrao Taywade
केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करून, राजकीय आरक्षण साठी केंद्र सरकारने 243 (T), 243(D) सेक्शन 6 मध्ये घटना दुरुस्ती करून देशातील ओबीसींना 27% राजकीय आरक्षण देण्यात यावे..डॉ बबनराव तायवाडे

चिमूर/प्रतिनिधी
ओबीसी समाजावर शैक्षणिक,आर्थीक,राजकिय , सामाजीक अधिकारावर वेळोवळी गदा आणली जात आहे.ओबीसी समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाची जातनिहाय जणगणना, ओबीसी जणगनणेत ओबीसी चा काॅलम आदी समस्येवर वाचा फोडण्यासाठी चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडून "ओबीसी जनगणना हक्क परिषद कार्यक्रम पार पडला अभ्यंकर मैदानात पार पडला .

या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॕ.बबनराव तायवाडे होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक  बबनराव फंड  ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव  सचिन राजुरकर , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते वृषभ राऊत  , सौ माधुरी रेवतकर , गजाननराव अगडे  यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधीकारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्यामजी लेडे,सहसचिव शरद वानखडे, जिल्हाध्यक्ष प्रा नितीन कुकडे,विजय मालेकर , राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधीकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष देवराव दिवसे , राष्ट्रीय ओबीसी विद्याथी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे , रजनिताई मोरे ,  प्रा जमदाडे ,पोर्णिमा मेहरकुरे , राजु हिवंज  आदी ओबीसी नेते उपस्थित होते.यामीणि कामडी , राजकुमार माथुरकर, श्रिकृष्ण जिल्हारे , संजय पिठाडे , आदी ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाला जि.प गटनेते  सतीश वारजुरकर,  माजी सभापती शोभा पिसे ,धनराज मुंगले , राजु लोणारे , अरूण लोहकरे,, प.स .सभापती लता पिसे ,संजय खाटीक,विजय झाडे,सुनिल मैंद , विलास डांगे , योगेश ठुणे ,सविता चौधरी,, वर्षा शेंडे आदी विविध राजकीय पक्षांचे ओबीसी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंदना कामडी व पंधरे तसेच प्रास्ताविक रामदास कामडी व आभार प्रदर्शन प्रभाकर पिसे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.

Dr. Babanrao Taywade