जिल्हा खनिकर्म कार्यालयाबाबत बदनामीकारक मजकुर; युट्युब चॅनेलवर एफआयआर दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ नोव्हेंबर २०२१

जिल्हा खनिकर्म कार्यालयाबाबत बदनामीकारक मजकुर; युट्युब चॅनेलवर एफआयआर दाखल

जिल्हा खनिकर्म कार्यालयाबाबत बदनामीकारक मजकुर;  युट्युब चॅनेलवर एफआयआर दाखल


चंद्रपूर दि.3 नोव्हेंबर : दि. 3 नोव्हेंबर 2021 रोजी विदर्भ न्यूज या यूट्युब चैनलवर पत्रकारोके नाम से महसूल अधिकारीयों ने रेत माफिया से वसुली राशी, पत्रकारों के नाम से वसूली करनेवाला व्हाट्सअप मॅसेज हो रहा वायरल, पत्रकारो कें नाम से खुद की झोली भरवाने खनन विभाग के धुरंदर कोण? वसुलीबाज अधिकारियों को मिलनेवाली तनख्वा कमी पडती है? व्हाट्सअप पर वायरल हो रहे मेसेज मे खनन के अधिकारी और ड्रायव्हर का नाम, पत्रकारोकें नाम से वसुली सत्र चलानेवाले खनन के अधिकारीयों पर कोन करेगा कार्यवाही? अशा प्रकारची निनावी मजकूर विदर्भ न्यूज या यूट्यूब चैनलवर वायरल करण्यात आला आहे. सदर वायरल न्यूजमुळे जिल्हा खनिकर्म अधिकारी व त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे बदनामी करण्याचे कारस्थान आहे असे दिसून येते. त्या अनुषंगाने विदर्भ न्यूज या यूट्यूब चैनलवर बदनामीकारक व चुकीचा मजकूर प्रकाशित केल्यामुळे या यूट्यूब चैनलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  असे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कळविले आहे.


#youtube #FIR #Chandrapur #police