आरटीओचा निर्णय । एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्षाची स्थापना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० नोव्हेंबर २०२१

आरटीओचा निर्णय । एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्षाची स्थापनाØ प्रवाशांना 07172-272555 या क्रमांकावर करता येईल संपर्क

चंद्रपूर दि.10 नोव्हेंबर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने चंद्रपूर येथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. संपाच्या कालावधीत प्रवाशांच्या असणाऱ्या अडचणी ,शंकाचे निरसन करण्यासाठी 07172-272555 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही त्या कक्षात करण्यात आल्या आहेत.त्या पूढीलप्रमाणे आहेत.
10 व 12 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य लिपिक प्रवीण अंदेकिवार, 11 नोव्हेंबर रोजी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विवेक तास्के, , 13 व 15 नोव्हेंबर रोजी कनिष्ठ लिपिक महेश कनवाडे, 14 व 16 नोव्हेंबर रोजी मुख्य लिपिक राजकुमार केळवतकर हे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी या कक्षात कार्यरत राहतील.प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज तातडीचे निर्देश देवून हा कक्ष कार्यान्वीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार नियंत्रण कक्ष सेवेचा प्रवाशांनी उपयोग करावा,असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


 #st #rto #STRIKE