निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले; एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ नोव्हेंबर २०२१

निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले; एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनएसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन दगावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव अनिल मारुती कांबळे, वय ३८ आहे. #ST #Employee #Death |  #STStrike

कोल्हापुरातील एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अनिल यांनी निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले होते. सावंतवाडी आगारात अनिल चालक कम वाहक म्हणून कार्यरत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. शासन कामावरून काढून टाकणार या दबावाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एसटी महामंडळाच शासनात विलिनीकरण करण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे असंख्य कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करण्यात येत आहे. याच तणावामुळे एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला आहे. अनिल मारुती कांबळे (वय-38) अस मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मडीलगे खुर्द गावात त्यांचे निधन झाले.

एसटी संपाचा तिढा सरकार सोडवत नसल्याने कांबळे यांना ताण आला होता. तसेच शासन कामावरून काढून टाकणार या दबावाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान कांबळे हे 2015 साली एसटी सेवेत सावंतवाडी आगारात भरती झाले होते.