Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

दिवंगत मुलाच्या जन्मदिनी मातपित्यांचा देहदानाचा संकल्प
तरुण मुलाच्या देहावसानानंतर त्याच्या जन्मदिनाला आईवडीलांनी स्वतःचे देहदान करण्याचा संकल्प सोडून समाजासमोर आदर्श निर्माण केल्याची माहिती देहदान चळवळीचे कार्यकर्ते डॉ सुशील मेश्राम यांनी दिली.
कोविडमुळे तथागत गायकवाड या हरहुन्नरी कलावंत तरुणाचे देहावसान झाल्याला आता सात महिने उलटले आहेत. २२ नोव्हेंबरला त्याचा जन्मदिवस होता. तरुणपणातच देहदान करून समाजात देहदानाची समज निर्माण करावी अशी त्याचीही इच्छा होती. मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि समाजात देहदानसाक्षरता वाढावी म्हणून तथागतची आई सुशीला गायकवाड आणि पिता प्रसेनजित गायकवाड यांनी स्वयंप्रेरणेने देहदान करण्याचा संकल्प केला आणि तसे संमतीपत्र डॉ सुशील मेश्राम यांचेकडे सुपूर्द केले.


देहदान करताना प्रसेनजित गायकवाड आणि सुशीला गायकवाड यांनी, मरणानंतर हा देह नष्टच करावा लागतो, परंतु तो वैद्यकीय शिक्षणासाठी वापरता आला तर वैद्यकीय संशोधनाला मोठी मदत होते आणि पुढील पिढ्यांच्या निरामय जीवनाची इमारत अधिक मजबूत करता येते; तसेच विद्यमान समाजाला आपल्यापुरते पर्यावरण प्रदुषणापासून दूर ठेवता येते आणि या निमित्ताने आपल्याकडून मरणोत्तरही समाजसेवा, देशसेवा होत राहते, असे मत त्यांनी व्यक्त केले.


Resolution of parents to donate body on the birthday of a deceased child

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.