चंद्रपूर शहरातील बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळा सौंदर्यीकारणाचे काम तात्काळ करा : भाजपच्या नगरसेविका सविता कांबळे यांची मागणी #rajabhaukhobragade - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ नोव्हेंबर २०२१

चंद्रपूर शहरातील बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळा सौंदर्यीकारणाचे काम तात्काळ करा : भाजपच्या नगरसेविका सविता कांबळे यांची मागणी #rajabhaukhobragade

 चंद्रपूर शहरातील बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळा सौंदर्यीकारणाचे काम तात्काळ करा : भाजपच्या नगरसेविका सविता कांबळे यांची मागणी 

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र  बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे यांचा पुतळा आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून पुतळा सौंदर्यीकारणाचे काम सुरु आहे. २ महिने होऊनही काम पूर्ण झाले नाही, सौंदर्यीकारणाचे काम तात्काळ करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या नगरसेविका सविता कांबळे यांनी दिला आहे. 


चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात नगरसेविका सविता कांबळे यांनी या विषयाकडे सभापती संदीप आवारी यांचे लक्ष वेधले. पुतळा सौंदर्यीकारण आणि संरक्षक भीतीचे काम तात्काळ करू, असे असे आश्वासन बांधकाम अधिकाऱ्यांनी दिले आहे.