आमदार जोरगेवारानी घेतली शरद पवारांची भेट; कोतवाली वॉर्डात पोलिसांचा फौजफाटा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ नोव्हेंबर २०२१

आमदार जोरगेवारानी घेतली शरद पवारांची भेट; कोतवाली वॉर्डात पोलिसांचा फौजफाटा

आमदार जोरगेवारानी घेतली शरद पवारांची भेट; कोतवाली वॉर्डात पोलिसांचा फौजफाटा 


राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते खासदार शरद पवार सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांचे गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले. दरम्यान, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. दुसरीकडे कोतवाली वॉर्डात जोरगेवार यांचे निवासस्थानी शरद पवार येणार असल्याची माहिती होती. सकाळी १० वाजेपासूनच शहर पोलिसांचा फौजफाटा येथे तैनात होता. पवार साहेब आमदार साहेबांच्या घरी येणार असल्याची चर्चा सुरु असतानांच आज पक्षप्रवेशतर होणार नाही, ना असेही बोलले जात होते. राजकारणातील भीष्मपितामह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा. श्री. शरद पवार साहेब यांचा सध्या विदर्भ दौरा सुरू असतांना त्यांनी माझा मतदारसंघ चंद्रपूर येथे भेट दिली, प्रसंगी त्यांची भेट घेऊन त्यांना शाल,  श्रीफळ, #ग्रामगीता देऊन त्यांचा सन्मान केला !, असे ट्विट जोरगेवार यांनी केले आहे. 

@PawarSpeaks @jorgewar_speaks


जोरगेवार यांचे राष्ट्रवादी प्रेम 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या ट्विटर हॅन्डलच्या नामात speaks असा शब्दप्रयोग असतो. पवार साहेबांच्या हँडलमध्ये @PawarSpeaks असे नाव आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्विटरवर NCPspeaks असे आहे. आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या  हँडलमध्ये  @jorgewar_speaks असा उल्लेख आहे. यावर जोरगेवार यांचे राष्ट्रवादी प्रेम स्पष्ट आहे.