उच्च न्यायालयाकडून नवाब मलिकांची खरडपट्टी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

उच्च न्यायालयाकडून नवाब मलिकांची खरडपट्टी

'मलिक, तुम्ही अधिक जबाबदारीने वागायला हवं'

वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर खाडाखोड 

नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या समीर वानखेडेंच्या जन्मदाखल्यातील खाडाखोडीकडे हायकोर्टाने वेधलं लक्ष

हायकोर्टाच्या सुनावणीत समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवीन माहिती समोर आणली. मलिकांच्या वकिलांचा बचावात्मक युक्तिवाद, कोर्टाने अंतिम निर्णय राखून ठेवला

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली असून, नवाब मलिक यांनी केलेले आरोप तत्थहीन असल्याचा दावा केला आणि या सगळ्या प्रकरणाची आता कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांचे वडील  ज्ञानदेव  वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यांच्या बाजूने बाजू मांडताना काही महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या. न्यायमूर्ती जामदार यांनी त्यांची बाजू मांडणारे एडवोकेट याना याबद्दल विचारणा केली. हा दस्तऐवज सार्वजनिक आहे ठीक आहे. पण तपासणे आवश्यक आहे. एका जबाबदार पदावर राज्यात मंत्री असताना यांनी पोस्ट करताना सावधगिरी बाळगायला पाहिजे, असा सल्ला कोर्टाने नवाब मलिक यांना दिला. तुम्ही आमदार, मंत्री, राजकीय पक्षाचे प्रवक्ते असताना संबंधित कागदपत्रांचा आधार घेताना तुम्ही अधिक काळजी घेणे आवश्यक नव्हते का? कारण कागदपत्रांमध्ये खोडतोड स्पष्ट दिसतात, हे तुम्हाला कसं कळलं नाही, असे खडेबोल कोर्टाने सुनावले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, समीर खान प्रकरण व अन्य चार प्रकरणांचा नव्याने तपास सुरू असून एनसीबीने आज एनडीपीएस कोर्टात समीर खान प्रकरणाच्या अनुषंगाने एक अर्ज केला आहे. एनसीबीने अर्जात केलेली विनंती पाहता समीर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर खान हे राज्याचे नवाब मलिक यांचे जावई आहेत. नवाब मलिक महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

समीर खान प्रकरणात आता एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे व येथील अन्य अधिकाऱ्यांऐवजी दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी तपास करत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची नव्याने पडताळणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून समीर खान आणि अन्य दोन जणांच्या आवाजाचे नमुने एसआयटीला घ्यायचे आहेत. त्यासाठी एनसीबीकडून आज विशेष एनडीपीएस कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. ही परवानगी मिळाल्यास तिघांचेही आवाजाचे नमुने घेऊन पुढील तपास केला जाणार आहे.दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात समीर खान आणि ब्रिटिश नागरिक करन सजनानी या दोघांना याचवर्षी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. दोघांकडे मोठ्या प्रमाणात सीबीडी आणि गांजा सापडल्याचा एनसीबीचा दावा होता. त्यातील एकूण १८ सँपल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ११ सँपलचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. एनसीबीच्या तपासात समीर खान आणि करन सजनानी यांच्यातील व्हॉइस चॅटची तपासणी करण्यात आली होती. काही आवाजाचे नमुने गोळा करून त्यांचीही पडताळणी करण्यात आली होती. आता पुढील तपासासाठी आवाजाचे नमुने नव्याने तपासावे लागणार असून त्यासाठीच एनसीबीने कोर्टात अर्ज केला आहे. या प्रकरणात आधीच्या तपास पथकाने आरोपपत्र दाखल केलेलं आहे. समीर खान आणि करन सजनानी या दोघांची जामिनावरही सुटका झालेली आहे. त्यामुळे आता नव्याने तपास सुरू झाल्यानंतर येत्या काळात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.