मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी अनेक नागरिकांनी घेतला पक्ष प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ नोव्हेंबर २०२१

मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी अनेक नागरिकांनी घेतला पक्ष प्रवेशमहाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर दक्षिण - पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे यांच्या छत्रपती नगर परिसरातील मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रामुख्याने शहर अध्यक्ष श्री अजय ढोके यांचेसह इतर मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्घाटनप्रसंगी बोलतांना मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांचे विचार जनतेने स्वीकारले आहेत. मनसे सत्तेसाठी नाही तर सामान्य माणसांच्या हितासाठी लढा देणारा पक्ष आहे यामुळे अनेक नागरिक पक्षात सामील होत आहेत. आज पक्षात ज्यांनी प्रवेश घेतला त्या सर्वांचे अभिनंदन करीत श्री गडकरी यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शहर अध्यक्ष श्री अजय ढोके यांनी नवीन सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनता मनसेच्या उमेदवाराला निश्चित आशीर्वाद देईल असा विश्वास व्यक्त केला. 

याप्रसंगी मनसे शहर उपाध्यक्ष रजनीकांत जिचकार, महिला सेना शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सचिन धोटे, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, विभाग संघटक सागर नान्हे, विधी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. रणजित सारडे, विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे, अनिकेत दहीकर, महिला सेना विभाग अध्यक्षा रचना गजभिये, विभाग उपाध्यक्ष चेतन शिरालकर, जयंतभाऊ नन्नावरे, सुनील गवई, नरेंद्र पाटील, प्रवीण बावणे, अमर काळे,  विभाग उपाध्यक्षा सौ. प्रिया बोरकुटे,  शाखा अध्यक्षा वैशाली फुलझेले, अनु सहारे, स्मिता वाघमारे, नवनियुक्त शाखा अध्यक्ष दुर्गेश यादव, देवेंद्र ठाकरे, सुधीर पळसखेडकर,उत्तम रागीट, साहिल बेहरे व मनसे पदाधिकारी अक्षय दहिकर, अरविंद बावणे, विनोद मोरे, प्रणय सुरजुसे, हर्षल गुडधे, प्रज्वल दुबे, शाम मेंढे, समशेर अन्सारी, चेतन विसपुते, शशिकांत मांजरे, महेश जुमळे, सागर शेवाळकर, बंटी जयतकर, राज अंभोरे, सागर हिवरकर, ललित मोहोड, यांचेसह परिसरातील मान्यवर नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 #nagpur @MnsHemant @mnsreport9