Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

रविवार, नोव्हेंबर २८, २०२१

अवैध दारुविक्रेत्या धानोरकरची हत्या; जयस्वालला अटक


 
अवैध दारुविक्रेत्या धानोरकरची हत्या; जयस्वालला अटक

वर्धा : दारुविक्रेत्या मनोज मुकुंद धानोरकर (32) रा. केळकरवाडी याची जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने सपासप वार करीत हत्या केल्याची घटना वर्धा शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली.  पोलिसांनी याप्रकरणी आकाश जयस्वाल याला अटक करुन पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मनोज भाड्याच्या खोलीत बेकायदेशीर दारुविक्री करीत होता. घरापासून अवघ्या काही अंतरावर भाड्याने खोली घेतली होती. त्या खोलीतून तो पोलिसांपासून लपून अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला फोन करुन जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशी तरी वाद सुरु असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.


मृतक मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर 2020 मध्ये मृतक मनोजने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आकाश जयस्वाल याने मनोजची हत्या केल्याची माहिती आहे. मृतक मनोज हा मध्यरात्रीच्या सुमारास दारु अड्ड्यावर असतानाच आरोपी आकाश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांनी मनोजवर हल्ला चढविला. मनोजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या हनुवटी, मान, पाठ, आदी ठिकाणी सुमारे 15 ते 20 वेळा सपासप वार करुन मनोजचा कोथळाच बाहेर काढला. हा थरार नागरिकांनी डोळ्याने अनुभवला असून या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली.  


 #Murder #Dhanorkar #Jayswal


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.