२४ नोव्हेंबर २०२१
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिवनेरी किल्ला रस्ता विकासकामासाठी भरघोस निधी
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर शहरातील श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिवनेरी किल्ला रस्ता ( जुन्नर - वडज - कुसुर रस्ता) या रस्त्यावरील फुटपाथ व गटार काम करणे या ०२ कोटी २६ लक्ष रुपयांच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर शहरात व तालुक्यातील सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.
रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांसह विविध विभागांच्या माध्यमातून भरघोस निधी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ना.दिलीप वळसे पाटील साहेबांच्या सहकार्याने आपल्याला प्राप्त झाला.
जुन्नर शहराच्या दृष्टीने महत्वाचे प्रोजेक्ट्स म्हणजे शिवसंस्कार सृष्टी साठी २३ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला याची आठवण याप्रसंगी उपस्थित जुन्नरकरांना करून दिली
शिवनेरी किल्ला रोपवे प्रोजेक्ट यासारखे विविध प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करत आहोत. भविष्यातील सर्व नियोजित प्रकल्प व कामे पूर्ण करण्यासाठी जुन्नरकरांची साथ महत्वाची आहे असे मत यावेळी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पापाशेठ खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोजभाई पठाण, भाऊसाहेब देवाडे, अरुणशेठ पारखे, नगरसेवक भाऊ कुंभार, सुनील ढोबळे, अक्षय मांडवे, अलकाताई फुलपगार, मोनाली म्हस्के, आश्विनी गवळी, हाजरा इनामदार, बारवचे सरपंच संतोष केदारी, कुसुरचे सरपंच दत्तात्रय कोकणे, अझिमभाई तिरंदाज, उज्वलाताई शेवाळे, आरतीताई ढोबळे, बाळासाहेब सदाकाळ, भूषण ताथेड आदी मान्यवर उपस्थित होते.
Lots of funds for road development from Shri Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Statue to Shivneri Fort
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
