दिवाळीनिमित्त नगरसेविका कल्पना बगूलकर यांच्यातर्फे सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ नोव्हेंबर २०२१

दिवाळीनिमित्त नगरसेविका कल्पना बगूलकर यांच्यातर्फे सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू |

दिवाळीनिमित्त नगरसेविका कल्पना बगूलकर यांच्यातर्फे सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूचंद्रपूर/ प्रतिनिधी 

दिवाळीच्या सणानिमित्त नगरसेविका सौ. कल्पना केशव बगूलकर यांच्यातर्फे बाबुपेठ प्रभागातील महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व शुभेच्छा दिल्या.


प्रभागात प्रत्येक महीन्याला "संपूर्ण नालीची सफाई करणे व झाडू मारुन रोड स्वच्छ ठेवणे तसेच फवारणी व फाॅगिंग करणे यात सफाई कर्मचारींचा खूप मोलाचा वाटा असून नागरिकाचे आरोग्य अबाधित राखण्यास मोलाची कामगिरी करतात अश्या कर्मचाऱ्याचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, असे मत नगरसेविका सौ. कल्पना केशव बगूलकर मांडले. म्हणून या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देऊन भेट वस्तू देण्यात आले. या शूभप्रसंगी शिपाई श्री बंडू मून, सफाई कर्मचारी श्री येलन्ना मामिडवार, श्री आईलन्ना मामिडवार, श्री अजय पोलशेट्टी, श्री साजण  सूनडेवाले, श्री कनणारे भाऊ,श्री अनिल चौधरी,  नागुबाईचांदेकर ताई, श्री निखिल भाऊ बैस ईत्यादी उपस्थित होते. Kalpana Bagulkar Chandrapur Diwali