Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

रविवार, नोव्हेंबर २८, २०२१

केंद्रीय राज्यमंत्राी रावसाहेब दानवे यांचेशी हंसराज अहीर यांची चर्चा | #hansrajAhir

 केंद्रीय राज्यमंत्राी रावसाहेब दानवे यांचेशी हंसराज अहीर यांची चर्चा; मंत्रीमहोदयांनी चंद्रपूर भेटीचे निमंत्राण स्वीकारलेचंद्रपूर- यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाण मंत्रालय, रेल्वे मंत्रालयाशी संबंधीत विविध प्रश्नांबाबत तसेच चंद्रपूर, बल्लारशाह व अन्य रेल्वे स्टेशनवर चालणाऱ्या गाड्या पूर्ववत चालविण्याचा आग्रह पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोल व रेल्वे राज्यमंत्राी रावसाहेब दानवे यांची नवी दिल्ली येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेवून केला.


या भेटीप्रसंगी अहीर यांनी जिल्ह्यात बंद करण्यात आलेल्या महत्वपूर्ण रेल्वे गाड्यांमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी व नोकरदार वर्गास मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, याकडे मंत्राीमहोदयांचे लक्ष वेधले. पुणे, मुंबई पॅसेंजर तसेच अन्य एक्स्प्रेस गाड्यांची यादी सादर करून काही गाड्यांना चंद्रपूरपर्यंत तर काहींना बल्लारशाह पर्यंत चालविण्यात याव्या अशी मागणी केली.


गत तीन महिण्यात जवळपास 2700 प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्यात नोकऱ्या मंजुर आहेत. परंतू वेकोलि प्रबंधनाकडुन त्यांना रूजु करण्यास विलंब होत असल्याच्या बाबींकडेही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रयांचे लक्ष वेधले. नोकरीस अपात्र ठरविल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या योग्यतेनुसार काम देण्याची आग्रही भूमिकासुध्दा अहीर यांनी यावेळी घेतली. मंत्राीमहोदयांनी कोळसा खाण प्रकल्पातील जुनी प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश संबंधीतांना द्यावेत अशी विनंती केली.

 शेतीच्या मोबदल्यापोटी मिळणाऱ्या धनादेशाचे वितरण तसेच नोकरी विषयक नियुक्तीपत्र प्रदान करण्यासाठी चंद्रपूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्रणही रावसाहेब दानवे यांना दिले.  घुग्घुस येथील राजीव रतन हाॅस्पीटलचे सेंन्ट्रल हाॅस्पीटलमध्ये अपग्रेडेशन झाल्यानंतर या हाॅस्पीटलला भेट देवून तेथे समारंभ करण्याची विनंती श्री अहीर यांनी केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.