दुर्गापूर - ऊर्जानगर नगर परिषदेचा प्रस्ताव पाठवा : आ. सुधीर मुनगंटीवार | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ नोव्हेंबर २०२१

दुर्गापूर - ऊर्जानगर नगर परिषदेचा प्रस्ताव पाठवा : आ. सुधीर मुनगंटीवार |

 मुंबई, ता.१० : दुर्गापूर - उर्जनगर नगर परिषद व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावा अशी सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी विधानभवन येथे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर आणि ऊर्जनगर या दोन ग्रामपचायतीतर्फे नगर परिषद करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात दोन्ही ग्रामपंचायतीनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करून दिला आहे. श्री मुनगंटीवार यांनी साचिवांशी चर्चा करतांना या मागणीचा पाठपुरावा करीत अडचणीविषयी सुद्धा साधक बाधक चर्चा केली. या बैठकीला सुज्योत नळे, देवानंद थोरात, शालिक फाले, बाळू चांदेकर, सुरेश तावडे, शैलेश शेंडे, लोकेश कोट्रांगे, हनुमान काकडे, गिरीश मानकर आदी उपस्थित होते.
Durgapur Urjanagar