लसीकरण झालेल्या दुकानावर लागले हिरवे स्टिकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ नोव्हेंबर २०२१

लसीकरण झालेल्या दुकानावर लागले हिरवे स्टिकर

 लसीकरण झालेल्या दुकानावर लागले हिरवे स्टिकर 

चंद्रपूर- (Chandrapur) कोरोनाला हद्दपार करण्यासाठी १०० टक्के लसीकरण आवश्यक असून, लोकांच्या सतत संपर्कात असलेल्या सेवापुरवठादारांची तपासणी करून घेण्यात येत आहे. ज्या आस्थापनाधारकांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, अशा ठिकाणी लाल, तर संपूर्ण लस घेतलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचे  स्टिकर लावण्यात येत आहेत.आयुक्त राजेश मोहिते आणि अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या सूचनेवरून झोन क्र. १ अंतर्गत दुकानात जाऊन लसीकरण बाबत तपासणी करण्यात आली. तपासणीत मालक व कर्मचारी यांचे दोन्हीही डोज झालेले आढळून आले. अशा दुकानात हिरवे स्टिकर लावण्यात आले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे.   जनतेशी सतत संपर्क येणाऱ्या प्रत्येक सेवापुरवठादार, फेरीवाले, भाजीविक्रेते यांनी लसीकरण करणे बंधनकारक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोननिहाय पथकाद्वारे लसीकरण प्रमाणपत्र तपासणी करण्यात येत आहे.