कोरोना लस घेणाऱ्यांना मिळणार फ्रिज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० नोव्हेंबर २०२१

कोरोना लस घेणाऱ्यांना मिळणार फ्रिज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही |

''आता लस घ्या, बक्षीस मिळवा !''


- महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी १२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान बंपर लसीकरण ड्रॉ   चंद्रपूर, ता. १० : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाचा टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दि. १२ ते २४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.     

मनपा कार्यालयातील सभागृहात महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील लसीकरण आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याबद्दल विचारमंथन करण्यात आले. त्याच अनुषंगाने लकी ड्रॉ उपक्रमाचा निर्णय घेण्यात आला असून, अधिकाधिक नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी केले आहे.       


''चंद्रपूर शहर महानगरपालिका - बंपर लसीकरण ड्रॉ''
  दि. १२ ते २४ नोव्हेंबर २०२१  
  -------------------------------
  • प्रथम बक्षीस - फ्रिज
  • दुसरे बक्षीस - वॉशिंग मशीन
  • तिसरे बक्षीस - एलईडी टीव्ही
  • प्रोत्साहनपर बक्षिसे - १० मिक्सर-ग्राइंडर

टीप - वर निर्देशित कालावधीदरम्यान लसीकरण केंद्रावर येऊन लस घेणारे नागरिकच लकी ड्रॉकरिता पात्र असतील. 


Corona vaccinators will get a fridge, washing machine, LED TV
Corona vaccinators will get a fridge, washing machine, LED TV