कारवा उपक्षेत्राअंतर्गत वाघाचा मृतदेह आढळला | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२७ नोव्हेंबर २०२१

कारवा उपक्षेत्राअंतर्गत वाघाचा मृतदेह आढळला |


 

चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर वाघाचा मृतदेह आढळला 

  चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्राअंतर्गत कारवा १ बिटातील कक्ष क्र. ५०० मध्ये दि. २७/११/२०२१ रोजी वाघ मादी अंदाजे ५ ते ६ वर्ष मृतावस्थेत आढळुन आली. मृतदेह ३ ते ४ दिवसापुर्वीचे असुन वाघाचे शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचे प्रतिनिधी, पशुधन विकास अधिकारी डॉ. विलास ताजणे व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी पुर्ण केला.


मृत वाघाचे सर्व अवयव सुरक्षित असुन मृत्युचे खरे कारण जाणुन घेण्याकरीता व्हिसेरा सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, मध्यवर्ती रोपवाटीका कारवा येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण चे प्रतिनिधी 
अध्यक्ष इको-प्रो संस्था  बंडू धोतरे, व प्रधान मुख्य वनसंरक्षकचे प्रतिनिधि मुकेश भांदककर उपस्थित होते.


#Chandrapur #tiger