राजकारणात महिलांनी पुढे यावे :काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांचे आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ नोव्हेंबर २०२१

राजकारणात महिलांनी पुढे यावे :काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांचे आवाहन

चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसतर्फे महिला मेळावा

चंद्रपूर : 
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. मात्र, राजकारणात प्रवेश करण्याबाबत महिलांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. त्यामुळे महिलांनीही राजकारणात सक्रियतेने पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विनोद दत्तात्रय यांनी केले.

चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुनीताताई अग्रवाल यांच्या पुढाकारातून येथील इंदिरानगरातील वानखेडे शाळा येथे आयोजित महिला मेळाव्यात श्री. दत्तात्रय बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितशे (रामू) तिवारी, वानखेडे शाळेचे संस्थापक श्रीकांत चहारे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका सुनीताताई लोढिया, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष अनुताई दहेगावकर यांची उपस्थिती होती.

यावेळी रितशे (रामू) तिवारी, सुनिताताई लोढिया, चित्राताई डांगे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संघटित-असंघटित सेल अध्यक्ष प्रा. वैशाली जोशी, नगरसेविका सकिना अंसारी, पॅरेंट्स बॉडीच्या उपाध्यक्ष कल्पनाताई गिरडकर, शहर उपाध्यक्ष काजी मॅडम, धांडे मॅडम, सुनंदाताई धोबे, प्रिया चंदेल, संध्याताई पिंपळकर, एकता गुरले, शहर सचिव वाणी दारला, शहर सहसचिव मुन्नी मुमताज शेख, शुभांगी टापरे, त्रिष्णा वरघने, वर्षा येलचलवार, महेक सैय्यद यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या मेळाव्यादरम्यान महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.