चंद्रपूरच्या दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबांना वीज दिव्यांची रोषणाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ नोव्हेंबर २०२१

चंद्रपूरच्या दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबांना वीज दिव्यांची रोषणाई

 


दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबांना वीज दिव्यांची रोषणाई

धनत्रयोदशीच्या निमित्ताने मंगळवारी लोकार्पण सोहळा
Date : 01 Nov 2021

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या माध्यमातून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते नागपूर रोडवरील आय लव्ह चंद्रपूरपर्यंत दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबांना वीज दिव्यांची रोषणाई लावण्यात येत आहे. लोकार्पण सोहळा धनत्रयोदशीच्या निमित्ताने २ नोव्हेंबर २०२१  रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल.

संजय गांधी मार्केट, नागपूर रोड येथे आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय कंचर्लावार राहतील. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती राहील.


 #chandrapur #lighting #poll