चंद्रपूर मनपाच्या बंपर लसीकरण ड्रा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ #Chandrapur #Covid #Luky - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२८ नोव्हेंबर २०२१

चंद्रपूर मनपाच्या बंपर लसीकरण ड्रा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ #Chandrapur #Covid #Luky

 चंद्रपूर मनपाच्या बंपर लसीकरण ड्रा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, ता. २८ : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली.  लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेस ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून लसीकरण टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.   नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लकी ड्रॉ उपक्रमाचा निर्णय घेण्यात आला.
प्रारंभी ही योजना १२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंत होती. मात्र या योजनेत आणखी नागरिकांना सहभाग घेता यावा, यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अधिकाधिक नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.