माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादनचंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ नोव्हेंबर २०२१

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादनचंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन


चंद्रपूर : 
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील प्रियदर्शिनी चौकातील इंदिरा गांधी यांच्या पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. १९) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. तर, काहींनी इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. 

कार्यक्रमाला कामगार नेते के. के. सिंग, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, नगरसेविका सुनीता लोढिया, डाॅ. रजनी हजारे, नगरसेविका वीणा खनके, नगरसेविका सकीना अन्सारी, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेवक नंदू नागरकर, अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, स्वाती त्रिवेदी, गोपाल अमृतकर, अश्विनीताई खोब्रागडे, संजय रत्नपारखी, सुनील पाटील, प्रवीण पडवेकर, मलक शाकीर, नरेंद्र बोबडे, इरफान बाबा शेख, कुणाल चहारे, सुरेश दूर्सेलवार, नासीर खान, राज यादव, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, भालचंद्र दानव, राजेंद्र वर्मा, वंदना भागवत, शालिनी भगत, गौस खान पठाण, बापू अन्सारी, पितांबर कश्यप, प्रसन्ना शिरवार, इरफान शेख, राहुल चौधरी, मनीष तिवारी, कासिफ अली, केतन दुरसेलवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-------