भोई समाज भद्रावती तर्फे क्रिकेटपटू रोहित नागपूरेचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ नोव्हेंबर २०२१

भोई समाज भद्रावती तर्फे क्रिकेटपटू रोहित नागपूरेचा सत्कार


क्रिकेटसाठी रोहितची सातासमुद्रापार गरुडझेप

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
            :- भद्रावती येथून ६ किलोमीटर अंतरावरील बरांज तांडा या अतिशय मागासलेल्या लोकवस्तीमधील  निवासी व भद्रावती येथे इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या भोई समाजातील १६ वर्षीय  रोहित रविंद्र नागपुरे ह्याची भारत देशाबाहेरील दुबई देशातील शारजहाँ येथे क्रिकेट मॅचमध्ये खेळण्यासाठी निवड झाल्याबद्दल भोई समाज भद्रावती तर्फे एका समारोहात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
         या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा समाजाचे युवा नेते नगरसेवक नंदुभाऊ पढाल हे होते तर सामाजिक कार्यकर्ते दिलीप मांढरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठेंगे, शहर समन्वयक गौरव नागपुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. रोहित यांचेसह जिल्यातील एकूण ४ क्रिकेट खेळाडूंची निवड झाली आहे.रोहितचे वडील रविंद्र हे गवंडी काम करीत असून लहानपणीच आईचे छत्र हरपलेल्या रोहितने अशाही  प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून सातासमुद्रापार  जाण्याची गरुड झेप घेतली.त्याच्या भावी वाटचालीस उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी समाजातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते.