ड्युटीवर असतांना पोलीस जमादाराचे निधन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०७ नोव्हेंबर २०२१

ड्युटीवर असतांना पोलीस जमादाराचे निधन.

मोहम्मद साबीर शेख यांचे आकस्मिक निधन.

संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

नवेगांवबांध दि.7 नोव्हेंबर:-
येथील पोलिस स्टेशन अंतर्गत भिवखीडकी बीटचे जमादार मोहम्मद साबिर मोहम्मद याकुब शेख (वय 55 वर्षे) यांचा आज दिनांक 7 नोव्हेंबर रोज रविवारला बीटमध्ये गस्तीवर असतानी 4.00 वाजे दरम्यान चक्कर येऊन पडले.लगेच त्यांना नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्यामागे पत्नी ,दोन मुली ,एक मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.ते मूळचे गोंदिया येथील रहिवासी आहेत.