धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू


औरंगाबाद- मध्य प्रदेशातून रोजगार साठी आलेल्या मजूर कुटुंबावर नियतीने मोठा घाला घातला . आई वडील शेतात कापूस वेचत असताना बहीण भावाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला . पोटचे गोळे क्रूर नियतीने हिरावल्याने त्या माऊलीने फोडलेल्या हंबरड्याने आसमंत चिरून निघाला . ही घटना रविवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडीत घडली . रितू (वय 12) आणि सचिन सीना डावर ( वय 8) अशी मृत भावंडांची नावे आहेत . या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.