मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही - इंदुरीकर महाराज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ नोव्हेंबर २०२१

मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही - इंदुरीकर महाराज


किर्तनकार- इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लसीबद्दल एक विधान केल्याने खळबळ उडाली आहे . मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही , असं विधान त्यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात केलं आहे . तसेच प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे . प्रत्येकाची मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे . मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही . काही होतच नाही तर घेऊन काय करणार , कोरोनावर एकच औषध आहे , मन खंबीर ठेवा . असंही ते म्हणाले .