या आहेत जगातील महाग दारू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ नोव्हेंबर २०२१

या आहेत जगातील महाग दारू

या आहेत जगातील महाग दारू 

महाग दारू पिणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते तर हलकी देशी दारू पिणे हे कमीपणाचे मानले जाते वास्तविक ही भ्रामक कल्पना आहे कारण दारू महाग असो की स्वस्त दारू ती दारूच.पण समाजात दारूला प्रतिष्ठा नसली तरी जातीभेदा प्रमाणे दारूच्याही जाती(येथे किंमतीनुसार हे लक्षात घ्या) पाडल्या जात आहेत हे विशेष.म्हणुन एका लेखकाने म्हटले आहे की, "गरीब पितो ती दारू,व श्रींमत पितो ती ड्रिंक".दारू जितकी जुनी असेल तितकीच ती महाग असते.जगातील सर्वात महागडी दारू कोणती? दारुचे दर हे पिणार्‍याच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. श्रीमंत लोक त्यांच्या घरातील पाहुण्यांना महागडी दारु पाजतात. जेणेकरून त्यांची त्यांच्यासमोर वट वाढेल.

या आहेत जगातील महाग दारू

जगातील या पाच दारू सर्वात महाग समजल्या जातात.मैक्लेन 1946- हिची किंमत 2 कोटी 89 लाख रुपये आहे. तर डेल्मोर (62 वर्ष जुनी) हिची किंमत 1 कोटी रुपये आहे. टकीला ले .925 असे या वाईनचे नाव आहे. त्याच्या बाटलीच्या पॅकेजिंगमध्ये 6400 हिरे जडवलेले आहेत. त्याची सुरुवात सर्वप्रथम मेक्सिकोमध्ये झाली. परंतु आजपर्यंत कोणीही ते विकत घेतलेले नाही. यामुळे, त्याचे वास्तविक मूल्य समजू शकले नाही.

या आहेत जगातील महाग दारू

अममांड डी ब्रिगनॅक मीडास, जगातील सर्वात महागड्या शॅम्पेनमध्ये याची गणना केली जाते. बाटली मोठ्या आकाराची असल्यामुळे त्याच्या किंमतीचे एक मोठे कारण आहे. त्याची किंमत 1 कोटी चाळीस लाखांहून अधिक आहे.

या आहेत जगातील महाग दारू

डिवा वोडका. असे म्हटले जाते याची चव नेल पॉलिश सारखी लागते. बाटलीच्या आतमध्ये मध्यभागी स्वारोव्हस्कीचे क्रिस्टल्स आहेत. हे क्रिस्टल्स ड्रिंकमध्ये मिसळून देखील मद्यपान करू शकतात.

डॅलमोर 62 ही जगातील सर्वात महाग व्हिस्की मानली जाते. ही एवढी महाग आहे की आजपर्यंत त्यातील फक्त बारा बाटल्या बनविल्या गेल्या आहेत. याची किंमत 1 कोटी चाळीस लाखांहून अधिक आहे.

पेनफोल्ड्स एम्प्यूल, ही सर्वात महागडी रेड वाईन आहे. पेनच्या आकारासारख्या बाटलीत येणाऱ्या या वाईनच्या एक बाटलीची किंमत एक कोटी अकरा लाखांच्या घरात आहे.

कोरा लिंक http://bit.ly/3DTFglr

Anil patilयांनी दिलेले उत्तर