२४ नोव्हेंबर २०२१
आज नवेगावबांध येथे भव्य विनामूल्य दंत,रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
नवेगावबांध दि.२४.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत दिनांक २४ नोव्हेंबर रोज बुधवार ला येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी ११.०० ते ४.०० वाजे दरम्यान भव्य दंत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील सर्व नामांकित व तज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी व रोगनिदान करून दाताच्या आजारावर विनामूल्य उपचार, शस्त्रक्रिया, औषध उपचार विनामूल्य करण्यात येतील. तसेच हायड्रोसिल, हर्निया, शरीराच्या गाठी, गर्भाशयाचे आजार याचे निदान व शस्त्रक्रिया देखील विनामूल्य करण्यात येणार आहे. दिनांक २४ ते २७ नोव्हेंबर पर्यंत रुग्ण तपासणी, दिनांक २५ ते २६ नोव्हेंबर शस्त्रक्रिया व तपासणी दिनांक २५ नोव्हेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत सोनोग्राफी रुग्णांची काढण्यात येईल. या शिबिराचे उद्घाटन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते, डॉ. संजय जयस्वाल,उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सर्व जनतेनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन, आपल्या रोगाचे निदान तसेच विनामूल्य शस्त्रक्रिया करून घ्याव्यात. असे आवाहन येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र टंडन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेश वाढिया, दंत शल्यचिकित्सक डॉ. श्याम भोयर, आयुष वैद्यकिय अधिकारी डॉ.रुपेश कापगते, डॉ. महेश लोथे यांनी केले आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
