मौजा कोदामेंडी येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते जमीन पट्टे वाटप. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ नोव्हेंबर २०२१

मौजा कोदामेंडी येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते जमीन पट्टे वाटप.संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२२ नोव्हेंबर:-
 पूरग्रस्त मौजा कोदामेंडी तालुका सडक अर्जुनी येथील कुटुंबाचे पुनर्वसनाची करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला होता, मात्र पूरग्रस्त कुटुंबांना घरकुलासाठी जमिनीचे पट्टे वाटपाची प्रक्रिया विविध तांत्रिक अडचणीमुळे अडकली होती. याबाबत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी अर्जुनी-मोर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली.१९९४ मध्ये आलेल्या पुरात कोदामेंडी येथील अनेक घरे पाण्याखाली आली होती व काही घरे पडली होती.  त्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मागील २६ वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे ग्रामवासी हतबल झाले होते. मात्र आता सर्वच ४२ लाभार्थ्यांना ५ एकरापेक्षा अधिक जागेवर प्लाटचे वाटप मा. आमदार यांच्या हस्ते दिनांक  २१ नोव्हेंबर रोजी ग्राम पंचायत कोदामेंडी येथे करण्यात आले.या कार्यक्रमास तहसीलदार सडक/अर्जुनी गावड, गट विकास अधिकारी श्रीकांत वाघाये, ग्रामविस्तार अधिकारी खुणे, सरपंच शैलेश उके, उपसरपंच प्रवीण भिवगडे, ग्रामसेवक बोरकर, देवानंद शहारे, अंजुम खान, रामदास भिवगडे, वीरेंद्र भिवगडे, तसेच ४२ लाभार्थ्यांचे कुटुंब व मान्यवर, गावकरी उपस्थित होते.अनेक वर्षापासून रेखाटलेले प्रश्न  आमदार यांनी मार्गी लावून जमिनीचे पट्टे मिळवून दिल्याबद्दल सर्वच लाभधारकांनी आनंद व्यक्त केला व आमदारांचे आभार व्यक्त केले.