भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते जगदिश काशिवार यांचे दुःखद निधन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ नोव्हेंबर २०२१

भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते जगदिश काशिवार यांचे दुःखद निधन.

 
हृदयविकाराच्या धक्याने दुःखद निधन.

संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

नवेगावबांध दि.१९ नोव्हेंबर:-
सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील ग्रा.प.चे सदस्य तथा पांढरी जि.प.क्षेत्राचे क्षेत्र प्रमुख व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगदिश काशिवार यांचे वयाचे ४६ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज (दि.१९) ११.३०वाजेदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.जगदिश काशिवार मनमिळाऊ स्वभावाचे व हसतमुख व्यक्तीमत्व होते.तसेच उत्कृष्ट वक्ता, गायक व नाट्य कलावंत होते.लहानमोठ्यांच्या सहवासात सतत वावरत असायचे , त्यामुळे ते कुटूंबातील सदस्यासारखे वाटायचे. ""काळाची महिमा काळच जाणे,कठीण तुझे अचानक जाणे....आजही घुमतो स्वर तुझा कानी ,वाहतांनी श्रद्धाजंली डोळ्यात येते पाणी..."" हे जगदिशा ,माझ्या जगदिशला तुझ्या कुशीत शांती लाभो""अशी हळहळ गावात व्यक्त होत आहे. जगदिश काशिवार यांचे मृत्यू पश्चात पत्नी ,दोन मुले ,आई भाऊ ,व बराच मोठा आप्तपरिवार आहे. जगदिश काशिवार यांचे अचानक मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. जगदिश काशिवार यांचेवर दि. २० नोव्हेंबर रोज शनिवारी स्थानिक मोक्षधामावर सकाळी ९.३०वाजे अत्यंसंस्कार करण्यात येईल.