राज्यपालांच्या हस्ते शेख इम्रान पुरस्काराने सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० नोव्हेंबर २०२१

राज्यपालांच्या हस्ते शेख इम्रान पुरस्काराने सन्मानित


बुलढाणा/ स्टार पोलीस टाइम्स न्युज

महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या हस्ते कोथळी येथील पत्रकार शिक्षक शेख इम्रान उस्मान याना राजभवन मुंबई येथे एक कार्यक्रमात समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य डायरेक्टर डॉ मणीलाल शिंपी यांच्या पुढाकाराने राजभवन येथे मा राज्यपाल यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला शेख इम्रान हे कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय मलकापूर पाग्रा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक; शैक्षणिक; पर्यावरण;आर एस पी राज्य प्रसिद्धी प्रमुख;आरोग्य या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असून पत्रकारितेच्या माध्यमातूनही विविध विषयाला वाचा फोडण्याचे काम ते नेहमीच करत असतात.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शेख इम्रान हे सामजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना भारत सरकार च्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतगत नेहरू युवा केंद्र च्या माध्यमातून जिल्हा युवा पुरस्कार देऊन सुद्धा गौरवन्यात आले आहे त्यांना या अगोदर आदर्श शिक्षक;युवा पत्रकारिता पुरस्कार अश्या विविध पुरस्कार सुद्धा देण्यात आले आहे.यावेळी आर एस पी चे महासमादेशक अरविंद देशमुख यांची ही उपस्थिती होती.