शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ नोव्हेंबर २०२१

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असताना पहाटे प्राणज्योत मालावली

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. पहाटे त्यांचे निधन झाले. 


अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षांत 
 पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वृद्धापकाळाने बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाली. त्यामुळे बाबासाहेबांची प्रकृती खालावली आणि निधन झाले. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.