नीट अव्वल राजुरा भूषण अनिरुद्ध डाखरे तरुणांसाठी प्रेरणादायी | Aniruddh Dakhare - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ नोव्हेंबर २०२१

नीट अव्वल राजुरा भूषण अनिरुद्ध डाखरे तरुणांसाठी प्रेरणादायी | Aniruddh Dakhare

 नीट अव्वल राजुरा भूषण अनिरुद्ध डाखरे तरुणांसाठी प्रेरणादायी

नगराध्यक्ष अरुण धोटे |  अनिरुद्ध याचा  सत्कारराजुरा |  वैद्यकीय क्षेत्रासाठी घेण्यात येणाऱ्या  नीट प्रवेश परीक्षेत राजुरा येथील अनिरुद्ध नानाजी डाखरे या विद्यार्थ्याने 720 पैकी 710 गुण मिळवून देशात 38 वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. ओबीसी प्रवर्गातून देशातून 9 क्रमांकावर आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी अभिनंदन केले असून अनिरुद्धाचे यशामुळे शहराला लौकिक प्राप्त झालेला आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करेल . राजुरा भूषण अनिरुद्ध चे यश हे तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गगार नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी व्यक्त केले.

आज दिनांक 11 नोव्हेंबरला नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी अनिरुद्ध डाखरे यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनिरुद्ध यांचे पालक यांचेही अभिनंदन याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.या प्रसंगी उमेश गोरे, सागर लोहे, प्रनय लांडे, अनंता गोखरे, निशांत काकडे, शुभम श्रीकोंडावार, प्रदीप वासाडे यांची उपस्थिती होती.