धक्कादायक: पत्नी बाहेर गावी असतांना ST कर्मचाऱ्यांची घरात आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ नोव्हेंबर २०२१

धक्कादायक: पत्नी बाहेर गावी असतांना ST कर्मचाऱ्यांची घरात आत्महत्या

चंद्रपूर:ललित लांजेवार:

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आता आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 ब्रह्मपुरीतील प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या सत्यजित ठाकूर वय 34 वर्षे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

संप कालावधीत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सत्यजीतला चारच महिन्यांची मुलगी आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहते. दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ आल्यानंतर पत्नीला शंका आली. त्यानंतर पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना कॉल केले. तेव्हा सहकाऱ्यांनी घरी जाऊन पाहिले असता आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे.