चांदागढ यूथ फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्य फ़राळ व कपडे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ नोव्हेंबर २०२१

चांदागढ यूथ फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्य फ़राळ व कपडे वाटप

 माणुसकीमुळे उजळली वंचितांची दिवाळी
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी शहरातील सेवाभावी संस्था चांदागढ यूथ फाउंडेशन संस्थांतर्फे गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त गरजूंना "खुशियों का डिब्बा" या अंतर्गत दिवाळी निमित्य फराळाचे व कपड्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून चांदागढ यूथ फाउंडेशन सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

1 नोव्हेंबर रोजी संस्थेमार्फत उड़िया टोला,ताडोबा या गावत अनाथ,गरीब व व गरजू व्यक्तींना दिवाळी निमीत्य फराळ व कपडे वाटण्यात आले आणि त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ईशान नंदनवार, उपाध्यक्ष लिखिल देवतळे,सचिव सिया नागपूरे,रूबिना शेख, अमित सोनटक्के,अपर्णा सोनटक्के, रुपल उराडे,शिल्पा, नेहा, अमित, एश्वर्या,इशिका, अपेक्षा, शाम तसेच इतर सदस्य उपस्थितीत होते.