नागपुरच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या आरोपीला चंद्रपुरात अटक: मुलगी परिवाराच्या स्वाधीन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ नोव्हेंबर २०२१

नागपुरच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या आरोपीला चंद्रपुरात अटक: मुलगी परिवाराच्या स्वाधीन

चंद्रपूर/ प्राजक्ता गटलेवार :
दिनांक ०१/११/२०२१ रोजी बुटीबोरी पोलीस स्टेशनला हजर होवून फिर्यादी यांनी आपली फिर्याद नोंदविली होती की, त्यांची 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी ही दिनांक ३१ १०.२१ रोजी सकाळी १०.०० वा.च्या सुमारास किराणा दुकानात जाते असे आपल्या आजी यांना सांगुन घरूण निघुन गेली पण परत आली नाही.

त्यांनी तीचा आजुबाजुच्या परिसरात व नातेवाईकांकडे घेतला पण ती सापडली नाही.फिर्यादीचे रिपोर्ट वर बुटीबोरी पोलीस स्टेशनला पळवून येणारा अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन पळवून नेलेली मुलगी व आरोपीचा शोध सुरु करण्यात आला. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर यांचेकडून सुध्दा सुरु होता.समांतर तपास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखाचे पथकास गोपनिय सुत्राकडुन माहिती प्राप्त झाली की, पळवून नेलेली मुलगी ही चंद्रपुर जिल्हयातील चंदनखेडा गावात राहत आहेत मिळालेल्या महितीच्या आधारे नमुद ठिकाणी पथक गेले असता तिथे पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी व त्या सोबत पळवून नेणारा आरोपी नामे सागर कंठीराम परचाके वय २३ वर्ष रा.किनारमडकी ता नागपूर हे दोघे मिळून आले.

त्या दोघांना ताब्यात घेवून पळवून नेणार आरोपी सागर कंठीराम परचाके वय २३ रा.किनारमडकी ता नागपूर याची विचारपुस केली असता त्याने सदर मुलीला पळवून नेल्याची कबुली दिली.त्याला पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन बुटीबोरी यांचे स्वाधिन करण्यात आले.

सदरची कार्यवाही ग्रामीण पुलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पुलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.ग्रामीण गुन्हे शाखा पुलिस विभाग चे निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पुलिस निरीक्षक जितेन्द्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, हवलदार गजेन्द्र चौधरी, महेश जाधव, सिपाही अजीज शेख, बालाजी साखरे, चालक हवलदार भाऊराव खंडाते, साइबर सेल चे सिपाही सतीश राठोड, महिला पुलिस सिपाही रुपाली मेश्राम ने कार्रवाई केली.