मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - टोपे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ नोव्हेंबर २०२१

मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - टोपे

 अहमदनगर- जिल्हा रुग्णालयाच्या ICU विभागात आज सकाळी आग लागली . या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला . ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो , असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं . तसेच मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली .