"आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा 4000 नागरिकांनी घेतला लाभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ नोव्हेंबर २०२१

"आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा 4000 नागरिकांनी घेतला लाभ


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
               :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात दिनांक 1 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर 2021 पर्यंत लोककल्याण मंडळ मुंबई ठाणे व शिवसेना भद्रावती तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती तालुक्यातील वेगवेगळ्या 30 गावांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन भाऊ मते यांच्या मार्गदर्शनात तसेच श्री रमेश भाऊ मेश्राम उपजिल्हाप्रमुख, श्री नंदू पढाल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक व श्री नरेश भाऊ काळे तालुका संघटक यांच्या नेतृत्वात आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. 
             या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री नंदू  पढाल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक भद्रावती यांनी तालुक्यातील जनतेला केले होते, या आव्हानाला साथ देत भद्रावती तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील 4000 नागरिकांनी या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी श्री बाळा शिरसागर उपतालुकाप्रमुख, श्री घनश्याम आस्वले युवा सेना तालुका समन्वयक, श्री गौरव नागपुरे युवा सेना शहर समन्वयक, श्री आशिष ठेंगणे प्रसिद्धीप्रमुख, येशु आर्गी, सौ माया नारडे महिला उपजिल्हाप्रमुख, सौ कल्पना भुसारी महिला तालुका संघटक, सौ माया टेकाम महिला शहर संघटिका, श्री राजू सारंगधर नगरसेवक, सौ कीर्ती पांडे महिला उपजिल्हा समन्वयक, सौ प्रीती सावं महिला तालुका समन्वयक, सौ मनीषा जुनारकर, सौ वर्षा आत्राम, सौ शीला आगलावे, शिव  गुड मल,  राहुल खोडे, सतीश आत्राम, मयूर शेडामे तसेच प्रत्येक गावातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.