राजुरा येथील अनिरुद्ध नानाजी डाकरे नीटमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये 38 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ नोव्हेंबर २०२१

राजुरा येथील अनिरुद्ध नानाजी डाकरे नीटमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये 38

राजुरा येथील अनिरुद्ध नानाजी डाकरे नीटमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये 38 वा तर ओबीसी प्रवर्गातून 9 वा


720 पैकी 710 गुण घेऊन अव्वल

राजुरा |  नुकत्याच जाहीर झालेल्या निट प्रवेश परीक्षेत राजुरा येथील अनिकेत नानाजी  डाखरे या विद्यार्थ्यांनी 720 पैकी 610 गुण प्राप्त करीत ऑल इंडिया रँक मध्ये 38 वा क्रमांक प्राप्त केलेला आहे तर ओबीसी प्रवर्गातून नवव्या स्थानावर  आहे. ग्रामीण भागातून मिळवलेल्या या यशामुळे अनिरुध्ध चे अभिनंदन होत आहे.

इयत्ता पाचवी पर्यंत स्टेला मारीस कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतलेल्या अनिरुद्धने पुढील शिक्षण नवोदय विद्यालय तळोधी येथून पूर्ण केले इयत्ता दहावी नंतर नीट च्या तयारीसाठी नांदेड येथे खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये तयारी केली . Covid-19 मुळे लाकडाऊन असताना तब्बल काही महिने  घरून ऑनलाईन नीट परीक्षेची तयारी केली.

या यशाचे श्रेय आपले आई-वडील व गुरुजनांना दिलेले आहे. अनिरुद्ध चे वडील जवाहरलाल नेहरू विद्यालय अवाळापूर येथे शिक्षक आहेत. पुढे एम्स मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा अनिरुद्ध डाखरे यांनी बोलून दाखविली.


Aniruddha dakare Neet All india Rank