दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ नोव्हेंबर २०२१

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला


दिवाळीच्या - पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे . एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे . ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे . घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही . त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे . या भाववाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे .