क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना 131व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन #mahatmafule - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२८ नोव्हेंबर २०२१

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना 131व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन #mahatmafule


क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना 131व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
जुन्नर ( वार्ताहर )
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना 131व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले ब्रिगेड जुन्नर तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी ब्रिगेड चे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जुन्नर शहराध्यक्ष संजय डोके यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्मी चे ब्लॅक कॅट कमांडो राम शिंदे मेजर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख प्रज्योत फुलसुंदर व शहर कार्याध्यक्ष सुमंत मेहर, शहर उपाध्यक्ष नितीन शेरकर उपस्थित होते.यावेळी नवीन पद नियुक्ती करण्यात आली.यामध्ये युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी ओमकार देवराम मेहेर व संकेत ज्ञानेश्वर शिंदे तर तालुका संघटक सागर मारुती भास्कर जुन्नर शहराध्यक्षपदी श्रीकांत लक्ष्मण मिरगुंडे शहर कार्याध्यक्षपदी अभिजित पांडुरंग वाघमारे शहर संघटक हर्षलजी शेटे तालुका सचिव ऋषिकेश रावसाहेब वाघोले तालुका उपाध्यक्ष सोशल मीडिया दुशांत भाऊसाहेब बनकर या पद नियुक्ती करण्यात आल्या.

यावेळी प्रसाद डोके, चंद्रकांत डोके, प्रमोद पठारे,
अमित डोके, अभिषेक मिरगुंडे, धीरज फटांगडे, ओमकार मिरगुंडे, मयूर कुमकर, सोहम ढोबळे, वेदांत अभंग,अमोल खंडागळे, चैतन्य कांबळे, प्रथमेश कांबळे,धनंजय डोके, सुनील केदारी, स्वप्निल मिरगुंडे, विजय कुर्हे आदी उपस्थित होते.