तारक मेहता का उल्टा चश्मातील एका कलावंताचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ ऑक्टोबर २०२१

तारक मेहता का उल्टा चश्मातील एका कलावंताचे निधन

नट्टू काका यांचं आज निधन 

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सर्वांचे लाडके नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचं आज निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचं निधन झाल्याचं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती.घनश्याम नायक यांचा जन्म १२ मे, १९४४ रोजी झाला. ३ ऑक्टोबर, २०२१ रोजी त्यांचे निधन झाले.