Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

तर जनगणेत सहभाग नाही: सुप्रिया सुळे यांना डॉ. ऍड. अंजली साळवे यांचे निवेदन

 
चंद्रपूर :
ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी असलेल्या पाटी लावा मोहिमेतील ओबीसींना संरक्षण मिळावे सोबतच ओबीसींची स्वतंत्र जनगणना होत नाही तोपर्यंत केंद्राकडून जनगणनेला स्थगिती मिळण्याबाबत संसदेत विषय मांडावा अशी मागणी करणारे निवेदन चंद्रपूरच्या दौऱ्यावर आलेल्या सह्याद्री कन्या आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या जेष्ठ नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना विदर्भ कन्या डॉ ऍड अंजली साळवे यांनी आज दिले.

2021 च्या जनगणनेत केंद्राद्वारे ओबीसीची जनगणना केल्या जात नसल्याने ओबीसींची जनगणना व्हावी या मागणीसाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, संसद आणि विधिमंडळा पर्यंत 2021 चा ओबीसी जनगणनेचा लढा पोहचविणा-या डॉ ऍड अंजली साळवे यांनी सुरू केलेल्या ‘पाटी लावा मोहीम’ अंतर्गत महाराष्ट्रातील असंख्य ओबीसी बांधव ‘सरकारने ओबीसीची गणना करावी अन्यथा 2021 च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ असा संदेश असलेली पाटी लावा मोहीम आंदोलन करीत आहेत. शांततापुर्वक पद्धतीने या पाटी लावा मोहिमेतील सह्भागी ओबीसी बांधवांविरोधात केंद्र किंवा राज्य सरकारने कोणतीही कारवाई करू नये व ओबीसींची स्वतंत्र जनगणना होत नाही तोपर्यंत जनगणनेला स्थगिती द्यावी या मागणीसाठी सदनात विषय मांडावा अशी विनंती करणारे निवेदन डॉ ऍड अंजली साळवे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले यावेळी राजेंद्र वैद्य, नितीन भटारकर, बंडू डाखरे, मेघा रामगुंडे, अभिजीत कुडे, गणेश पिंपळशेंडे, सुजित कावळे, सुमती कुचनकार, डॉ अशोक कुडे, डॉ. संजय लोहे, प्रा. रमेश हुलके, बळीराज निकोडे, एस के बांदुरकर, सुनिल काळे यांचेसह बहुसंख्य ओबीसी उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.