Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०१, २०२१

शशांक नामेवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार | State level Adarsh ​​Shikshaketar Karmachari Sevaratna Award to Shashank Namewar

शशांक नामेवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार 

गडचांदूर | मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद-२०२१ राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार-२०२१चे पुरस्कार प्राप्त मानकरी म्हणून शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर जि. चंद्रपूर चे मुख्य लिपिक शशांक शंकरराव नामेवार यांना जाहीर झाला. 

State level Adarsh ​​Shikshaketar Karmachari Sevaratna Award to Shashank Namewar          सदर पुरस्कार  प्रमाणपत्र, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीच्या सदस्य असलेल्या गठीत समितीद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे.  आयोजकांकडून विविध पुरस्‍कारासाठी राज्यभरातून आवेदनपत्र  मागविण्यात आले होते. यामध्ये विदर्भातुन  त्यांच्या प्रस्तावाची निवड करण्यात आलेली होती. परिषदेमध्ये पात्र प्रस्तावांना विविध गटात पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून. सदर पुरस्कार दि.२४ डिसेंबर, २०२१ ला पुणे येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

 श्री.शशांक शंकरराव नामेवार हे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यात,विविध उपक्रमात,तसेच राष्ट्रीय सेवा योजना, प्रौढ शिक्षण, गुणवत्ता हमी कक्ष(IQAC) तथा माजी विध्यार्थी, पालक समिती , सामाजिक व राजकिय उपक्रमात सहभागी असतात.श्री.शशांक नामेवार हे उपरोक्त सर्व समित्यांचे सदस्य असून त्यांनी २०० च्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांनी प्रशासकीय गुणवत्ता सुधार अंतर्गत अनेक उद्बोधन व उजळणी वर्ग पूर्ण केले आहे. त्यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार-२०२०  आणि  आतंरराष्ट्रीय परिषदेमध्ये  बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर -२०२१ हा आतंरराष्ट्रीय पुरस्कार  प्राप्त झाला आहे.  प्राप्त झाला आहे.या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार-२०२१ जाहीर झाला आहे, त्यांच्या या  यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


State level Adarsh ​​Shikshaketar Karmachari Sevaratna Award to Shashank Namewar


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.