सिंदेवाही नगरपंचायतीची हद्दवाढ; ‘सिंदेवाही-लोनवाही’असे नामकरण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

सिंदेवाही नगरपंचायतीची हद्दवाढ; ‘सिंदेवाही-लोनवाही’असे नामकरण

सिंदेवाही नगरपंचायतीची  हद्दवाढ; ‘सिंदेवाही-लोनवाही’असे नामकरण

चंद्रपूर दि. 15 ऑक्टोबर : शासनाच्या संदर्भीय अधिसूचनेद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही (Sindewahi) नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत लोनवाही (lonwahi) व ग्रामपंचायत रामाळा अंतर्गत आंबोली हे गाव समाविष्ट करून हद्दवाढीनंतर सदर नगरपंचायतीचे नाव ‘सिंदेवाही-लोनवाही’ असे करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी कळविले आहे.