वाघाच्या हल्ल्यात शेरावालीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ ऑक्टोबर २०२१

वाघाच्या हल्ल्यात शेरावालीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दुर्गापूर,सिनाला मार्गवर उघडकीस आली आहे.मृतक हा पद्मापूर कोळसा खाणीत चालणाऱ्या शेरावाली ट्रान्स्पोर्ट कंपनीअंतर्गत ट्रक वर हेल्पर म्हणून कार्यरत होता.दुर्गापुर सिनाला मार्गावर घनदाट जंगल असून या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असतो. अशातच ट्रक वर काम करत असलेला हेल्पर शोउचस गेला असता परिसरात दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे