चंद्रपूर मनपात राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवस | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३१ ऑक्टोबर २०२१

चंद्रपूर मनपात राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवस |

 चंद्रपूर मनपात राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवसचंद्रपूर, ता. ३१ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांचा स्मृती दिवस राष्ट्रीय संकल्प दिवस व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस आयोजित करण्यात आला होता.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत दोन्ही महापुरुषांना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह परिसरातील  इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वीकृत नगरसेवक देवेन्द्र बेले, मनपाचे कर्मचारी विकास दानव, गुरुदास नवले यांची उपस्थिती होती.
 #SardarVallabhbhaiPatel #IndiraGandhi
 #SardarVallabhbhaiPatel #IndiraGandhi