नव्या स्थायी समिती सभापतींचा धडाकेबाज निर्णय; आठ दिवसांचा दिला अल्टिमेटम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

नव्या स्थायी समिती सभापतींचा धडाकेबाज निर्णय; आठ दिवसांचा दिला अल्टिमेटम

नव्या स्थायी समिती सभापतींचा धडाकेबाज निर्णय; आठ दिवसांचा दिला अल्टिमेटम  चंद्रपूर : महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे नवनियुक्त सभापती संदीप आवारी (Sandip Awari) यांची आज पहिली सभा ऑनलाईन पार पडली.  सभेत अवघ्या दहा मिनिटात तब्बल २३ विषयांना मंजुरी देत विकासाचे धडाकेबाज  धडाकेबाज निर्णय घेतले. नवनियुक्त सभापती संदीप आवारी (Sandip Awari) यांनी खोदकाम आणि  जेसीबी वारंवार खराब होत असल्याच्या विषयावर आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला .

मागील आमसभेत स्थायी समितीमध्ये नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती झाली. अध्यक्षपदी सत्ताधारी पक्षाचे संदीप आवारी (Sandip Awari) यांची अविरोध निवड झाली. आवारी यांच्या अध्यक्षतेखाली आज 22 ऑक्टोबर स्थायी समितीची पहिली सभा  घेण्यात आली. या सभेला महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे (Ashok Garate) उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जेसीबी वारंवार खराब होत असल्याचा विषय सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर तातडीने दखल घेण्यात आली.