मुल शहरातील अपघात घडविणारे डीवाईडर हटवा - भास्कर खोब्रागडे यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ ऑक्टोबर २०२१

मुल शहरातील अपघात घडविणारे डीवाईडर हटवा - भास्कर खोब्रागडे यांची मागणी
मुल शहरातील अपघात घडविणारे डीवाईडर हटवा - भास्कर खोब्रागडे यांची मागणी

मुल/शहर प्रतिनिधी
मुल शहरातील बस स्थानक समोर चुकीच्या जागी डीवाईडर बसविण्यात आल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो अशातच वाहतूक पोलिस कर्तव्यावर बरोबर उपस्थित राहत नसल्याने वाहतूक कोंडी ने अनेकांचे छोटे मोठे अपघात झालेले आहेत यावर संबंधी प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सदर दिवाईडर तात्काळ हटविण्यात यावा अशी मागणी मुल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे यांनी केली आहे.
मान. आमदार व माजी वित्त , नियोजन वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी मुल शहराच्या रस्त्याचा विकासात व सौंदर्यात भर पडावी म्हणून मुल तालुक्यात अनेक अंतर्गत रस्त्यासह मुख्य रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव मंजूर करून भरगच्च निधी दिला त्यानुसार कंत्राट दरमार्फत काम सुद्धा पूर्ण करण्यात आले तर अनेक ठिकाणी मार्गक्रमण करताना नागरिकांना व वाहन चालकांना अडचणी येऊ व अपघात घडू नयेत म्हणून निवडक ठिकाणी डीवाईडर बनविण्यात आले. मात्र त्यात अनेक त्रुटी दिसत असून मार्गक्रमण करणाऱ्यांना काही सोईचे तर काही अडचणीचे व अपघातास आमंत्रण देणारे ठरत आहेत.
   सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग मुल अंतर्गत येत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांकडून सदर मुख्य मार्गाची चौकशी करून मार्गक्रमण करताना अडचणीचे व अपघातास आमंत्रण देणारे दीवाईडर ची चौकशी करून  तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी मुल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे यांनी केली आहे.  
       तसेच या बाबतीची सूचना संबंधित विभागाच्या अभियंत्यांना वारंवार देऊन सुधा काहीच कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत असून येत्या काही दिवसात निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. 
          येवढेच नाही तर शहरात वाहतूक नियम सुरळीत राहावे छोटी छोटी मुले सुरळीत मार्ग ओलांडावे व भरदाव वाहनाने वाहकाचा नियंतरण जाऊन अपघात होऊ नये म्हणून पोलिस विभागा मार्फत वाहतूक पोलिस इंजार्ज सह नियुक्ती केलेली आहे मात्र त्यांच्याकडून वसुली व्यतिरिक्त काहीच कार्यवाही होत नसून कधी चहाच्या टपरीवर तर कधी कुठेतरी विसावा घेताना दिसतात. वाहतूक पोलिस कर्तव्यावर बरोबर उपस्थित राहत नाहीत वाहतूक कोंडी होते परिणामी वाहतूक अडथल्याने अनेक अपघात घडतात व त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्यास तुम्ही आम्हाला सांगणारे कोण अधिकाऱ्याकडे तक्रार करा आम्ही बघू  निघा नाही तर ज्यास्त केल्यास तुमच्या वाहनावर कोणत्या ना कोणत्या कारणाने कार्यवाही करू अशी धमकी वाहतूक पोलिस यांचे कडून दिल्या जात आहे. त्यामुळे ठाणेदार मुल यांनी सद्यस्थितीत नियुक्ती करण्यात आलेल्या वाहतूक पोलिस यांचेवर कर्त्याव्यावरील त्रुटींची चौकशी करून कारवाई करून  त्याजागी नवीन वाहतूक पोलिस यांची नियुक्ती करावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

remove the divider that caused the accident in Mul city - Demand of Bhaskar Khobragade