उत्कृष्ट महिला मंच मातृशक्तीसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ : राखी कंचर्लावार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑक्टोबर २७, २०२१

उत्कृष्ट महिला मंच मातृशक्तीसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ : राखी कंचर्लावार



मातृशक्तीने घेतले मेकअपचे धडे

महिलांनी आज सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळविले आहे.अंतराळात देखील महिला उंच भरारी घेत आहे,असे असले तरी सावित्रीच्या या लेकीवरील अत्याचार कमी झाले नाही.शिक्षण प्रशिक्षण घेतांना, अश्या संवेदनशील विषयांकडे पण लक्ष घातले पाहिजे.उत्कृष्ट महिला मंच मातृशक्तीसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ ठरू शकते,असे प्रतिपादन महापौर राखिताई कंचर्लावार यांनी केले.त्या उत्कृष्ट महिला मंच तर्फे आय एम ए सभागृहात सोमवार(25 ऑक्टोबर)ला आयोजित एकदिवसीय मेकअप कार्यशाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.


यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उत्कृष्ट महिला मंच अध्यक्ष व कार्यशाळा संयोजिका छबुताई वैरागडे,सचिव साक्षी कार्लेकर, डॉ प्रेरणा कोलते, डॉ शर्मिला पोदार,मिस विदर्भ ऐश्वर्या खोब्रागडे, सोनम मडावी, स्मिता रेभनकर, कल्पना भुते, मेकअप तज्ञ आयुषी भुते यांची उपस्थिती होती.
कंचर्लावार म्हणाल्या, मेकअपमूळे आपण सुंदर तर दिसतोच,पण या सोबत मनाची सुंदरता पण हवी.यावेळी प्रास्ताविकात बोलतांना छबुताई वैरागडे म्हणाल्या, मेकअप हि एक कला आहे. ती आत्मसात करून व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे.हि कला आत्मनिर्भर होण्यास उपयुक्त ठरू शकते. उत्कृष्ट महिला मंच महिलांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध आहे. अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सोनाली आंबेकर यांनी केले.पूजा पडोळे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी सुवर्णा लोखंडे,रंजना माणुसमारे,मंगला मोगरे, सारिका भुते, अर्चना येरणे, भावना येरणे ,मोना नेवलकर, सारिका बोराडे, किरण बलकी, वसू बोडके, प्रणिता जुमडे, आरिफा शेख, नितु वैरागडे, अपर्णा चिडे, अर्चना चहारे,, कल्पना शिंदे,चंदा घोडमारे, कल्पना बळी, नीलिमा रघाताटे यांनी परिश्रम घेतले.